मालेगावात ३० तलवारींसह तिघा संशयितांना अटक

नाशिक | प्रतिनिधी
मालेगांव शहरातील नायपुरा भागातील एका कारखान्यातून तीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तर तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध रित्या तलवारी बाळगत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर पोलीस निरीक्षक अजयकुमार घुसर यांच्यासह विशेष पथक यांचे पथक रवाना झाले.

यावेळी वरळी रोडवरील एका पावरलूम कारखान्यात त्यांनी छापा टाकला. यावेळी बंद पोत्यात ३० तलवारी आढळून आल्या. यावेळी या सर्व तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या बंद पोत्यामधील तलवारी मालेगावात विक्री करणे किंवा गंभीर गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.