सावधान ! नाशिक जिल्ह्याच्या वेशिवर येऊन धडकला ओमायक्रॉन..!

नाशिक | प्रतिनिधी
जगभरात धास्ती निर्माण करणारा ओमायक्रोन (Omicron) नाशिकच्या (Nashik) वेशीवर आला असून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmadnagar) दोन रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात ओमायक्रोन रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे(Pune) नंतर आता अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shreerampur) येथे दोन ओमायक्रॉन बाधित आढळल्याची जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांची माहिती दिली आहे. या दोन्ही व्यक्ती नायझेरियातुन प्रवास करून आल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने चिंता व्यक्त केली आहे. देशात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार पाऊले उचलत आहे.

तर देशातही ओमायक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात आज ३५८ ओमायक्रॉंनचे नवे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार तातडीने बैठका घेत आहे.