नाशिक । प्रतिनिधी
एन डी पाटील रोड परिसरात आज दुपारी डांबराची खडी वाहणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
शहरातील एन डी पाटील रोड परिसरात गॅस पाईपलाईन चे काम सुरु आहे. यावेळी गॅस पाईपलाईन बुजविण्याचे काम सुरु असताना हि घटना घडली. येथील रस्त्याच्या खड्ड्यात ट्रकचे चाक अडकल्याने ट्रक उलटल्याची प्राथमिक माहिती आहे.
डांबराची खडी भरलेला ट्रक उलटल्यांनंतर गरम डांबरा खाली दबून एक कर्मचारी गंभीर रित्या भाजला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी इसमाला रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.