सुरगाणा तालुक्यातील कुकुडमुंडा ग्रामपंचायतीवर महिलांचा ठिय्या

सुरगाणा । प्रतिनिधी

मागील पाच वर्षात एकही काम झाले नसल्याने श्रमजीवी संघटनेला सोबत घेऊन महिलांच्या वतीने कुकुडमुंडा ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्यात आले.

सुरगाणा तालुक्यातील सात आठशे वस्तीचे कुकुडमुंडा हे गाव आहे. आदिवासी भागात असल्याने येथे सोयी सुविधांची वाणवा आहे. यासाठी महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांना धडा शिकवला आहे. तालुक्यात काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेला सोबत घेऊन ग्रामपंचायतीवर आंदोलन केले आहे.

आंदोलन कर्त्या महिलांनी सांगितले कि, ‘गेल्या पाच वर्षापासून कोणतेही काम पूर्ण झाले नसून यामध्ये कुकुडमुंडा ग्रामपंचायत पैकी उंबरपाडा , कुकुडमुडा. दांडीचीबारी, आंबाडदहाड, वडपाडा येथेही अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे इजा पाड्यांवरील गावकरीही या आंदोलनात सहभागी होते. हि सर्व आदिवासी गवे असून येथे पेसा अंतर्गत अनेक कामे होत असतात. त्याचबरोबर १४ व १५ व्या वित्त आयोवागनुसार देखील विकासकामे केली जातात. मात्र येथे अनेक काम झाली नसल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेविका सीता थविल यांनी मागील २०१७ पासूनची जी कामे अपूर्ण अवस्थेत असतील ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष, राजू राऊत, ता सचिव दिनेश मिसाळ, सीताराम सापटे, गोविंद वाघमारे, विष्णू वाघमारे, परशराम वाघमारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.