द्वारका चौकात ट्रकने दुचाकी चालकाला चिरडले !

नाशिक । प्रतिनिधी
नाशिकच्या द्वारका चौकात भीषण अपघात झाला असून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकी चालकाला चिरडले आहे. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.

नेहमी वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या द्वारका चौकात सातत्याने अपघात होत असतात. आजही एका ट्रकचालकाने दुचाकी चालकाचा जीव घेतला आहे. दुचाकी चालक इंदिरानगरकडे जात असतना ओपाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यास धडक दिली. यात दुचाकी चालक ट्रकच्या टायर खाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातांनंतर ट्रक चालक पळून जात असताना जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.