‘सध्याचं राजकारण घृणास्पद’, उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्ला..!

संजय राऊत (Sanjay Raut Areested) यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद(Press Conference) घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांवर ईडने (ED Investigation) कारवाई करत त्यांना अटक केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तात्काळ पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला. ‘विरोधक काही बोलले तर त्यांना वाटेल ते करून अडकवायचं, दमदाटी करून किंवा लोभाने तो शरण आला नाही तर त्याला अडकवायचं अशी स्थिती देशात आहे. गडकरी जसं म्हणतात राजकारण सोडावं वाटतं तसंच वाटायला लागलं आहे. सध्याचं राजकारण अत्यंत घृणास्पद आहे. ‘पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेला सामोर जावं’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर(BJP) हल्लाबोल केला आहे.

‘संजयचा मला अभिमान आहे, तो निर्भिड आहे, पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, त्याचा गुन्हा काय? आहे. जे पटत नाही ते बोलतोय. त्याचं वाक्य चांगलं आहे ‘मरण आलं तरी शरण जाणार नाही’ असं तो म्हणतो. तोही शरण जाऊ शकला असता, जे शरण गेले ते हमाममध्ये गेले आहे. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे, तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांनाही सुनावलं आहे.

पहा व्हिडिओ..

https://youtu.be/tVF5lqNq5q4