विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायतीमधील उंबुरणे येथील विहिरीत पडून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, बा-हे वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या उंबरने येथील देविदास कोहिकरे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे माहिती मिळाली. रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला. मात्र त्याला काठावर येता येईना. रात्रभर पोहून पोहून दमल्यानंतर अखेर पाण्यात बुडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान सकाळी एक महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली असता ही बाब निदर्शनास आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी गोपाळ गवारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घलघेत पाहणी केली. मात्र विहीर काठोकाठ भरली असल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यात अनेक अडचणी आल्या.

सात ते आठ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास बाहेर काढण्यास यश आले. त्यानंतर बा-हे येथील वनविभागाच्या आवारात बिबट्यावर अंत्यसंस्कार
करण्यात आले. मात्र आणखी एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू बिबट्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.