‘व मनी माय नवा कोरोना उना, लसीकरण करिले’

नाशिक । प्रतिनिधी

ओमायक्रोनच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासन वारंवार देत आहे. नाशिक जिल्ह्यातही लसीकरणाबाबत विविध उपक्रम राबविले जात असून मागील आठ दिवसांत तब्बल ८० हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान जगभरात ओमायक्रोनची भीती असल्याने प्रशासन लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे लसीकरांचा वेग वाढविण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लस नाही तर प्रवास नाही, कार्यालयात प्रवेश नाही, शाळा प्रवेश नाही, तसेच‘हर घर दस्तक’ मोहीम राबवून घरोघरी जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढत आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांत नाशिक जिल्ह्यात तब्ब्ल ८० हजार नागरिकांनी लस टोचून घेतली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी लसीकरणाकडे पाठ फिरवलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. कारण नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांची धास्ती वाढल्याने लसीकरणाला गती आली आहे. त्यामुळे लसीकरण वाढत असून ग्रामीण भागातही या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान आज लसीकरण केंद्रांवर लाभार्थींची गर्दी वाढलेली दिसून आली.

कोरोना काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर लाभार्थींची पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेकडे दुर्लक्ष केले होते. अनेक केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र आता नव्या व्हेरिएंटमुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागाने लसीकरण करून घ्या,टाळाटाळ करू नका असे आवाहन केले आहे.