सावधान! नाशकात ५ ला ५० मिळवून देणार रॅकेट सक्रिय

नाशिक । प्रतिनिधी

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करून हि मदत मिळवता येते. मात्र याचा गैरफायदा कोरोना मृतांच्या नातेवाईकांना गंडा घालण्याचे काम नाशकात केले जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर देखील जारी करण्यात आला आहे. त्यानंतर, संकेतस्थळावर जाऊन नातेवाईकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होता. मात्र अशातच काही अशिक्षित नातेवाईकांना फसविण्याचा प्रकार नाशकात घडत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतच्या तक्रारी नाशिक वैद्यकीय विभागाला प्राप्त झाल्या असून यामुळे खळबळ उडाली आहे.

म्हणजेच नाशकात एकप्रकारे नातेवाईकांना जाळ्यात अडकवण्याचे प्रकार सुरु असून या संदर्भातील रॅकेट नाशकात सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. हे रॅकेट कोरोना मृतांच्या नातेवाइकांना अनुदान मिळवून देण्याचे आमिष देते. यामध्ये ५० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी नातेवाईकांना ५ हजार रुपये सदर एंजटला द्यावे लागतात. दरम्यान अशा पद्धतीने कोरोना मृतांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

याबाबत नाशिक वैद्यकीय विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून वैद्यकीय विभागाकडून तपास सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी याबाबत सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय विबीभागाकडून सांगण्यात आले आहे.