बसचालकाला मारहाण कराल तर महागात पडेल!

नाशिक । प्रतिनिधी

बस चालकाला मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीस एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशकातील द्वारका चौकात हि घटना घडली होती. मात्र हि मारहाण आता संशयित आरोपीला चांगलीच महागात पडली आहे.

नाशिक शहरात गेल्या सात ते आठ महिन्यापासून नाशिक मनपाच्या बसेस धावत आहेत. या बसेसला नाशिक शहरातून तसेच मनपा हद्दीतून चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. मात्र अनेकदा काही कारणांमुळे प्रवाशांमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशीच एक घटना शहरातील द्वारका सर्कल येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. सायंकाळच्या सुमारास सीबीएस येथून बस नाशिकरोडकडे निघाली होती.

यावेळी गर्दी असल्याने मुंबई नाक्या कडून येणाऱ्या एका दुचाकी चालकाला बसचा धक्का लागला. यावेळी सदर दुचाकी चालकाने बसला थांबविण्यास सांगून बसमध्ये चढला. ‘तुला बस व्यवस्थित चालवता येत नाही का असे म्हणून शिवीगाळ करीत चालकास मारहाण केली. यानंतर पोलिसांना या संशयितास अटक करीत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी मोहम्मद इब्राहिम शेखला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेमुळे आता अशा घटनांना नक्कीच आळा बसेल अशी आशा बस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.