मुंबई । प्रतिनिधी
बॉलिवूडची विशेष जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. राजस्थानमधील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये ९ डिसेंबरला या दोघांचे लग्न होणार आहे. दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी दोघेही आपापल्या कुटुंबासह लग्नासाठी राजस्थानला रवाना झाले.
दरम्यान विकी कौशल आणि कतरीना कैफचे कुटुंबीय विवाहस्तहली पोहचले असून विवाहसोहळ्यासाठी ऑल सेट झाले आहे. तर विकी कौशलसह कतरीना देखील विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहचली आहे. याबाबतचे या दोघांचे फोटो समोर आले होते, ज्यात कतरिना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ व इतर वऱ्हाडी जयपूरला पोहचले आहेत. तर अनेकजण चौथ का बरवारा सवाई माधोपूरला रवाना झाले आहेत. आजपासून लग्नाचे समारंभ आणि विधी सुरु होतील.
विकी आणि कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील बरवारा किल्ल्यावर लग्न करणार आहेत. किल्ला दिवे आणि कंदिलांनी सजवला आहे. बारवारा किल्ला ‘सिक्स सेन्स फोर्ट’ म्हणूनही ओळखला जातो. या ठिकाणी विशेष तयारी केली असून पाहुण्यांच्या आगमनाला सुरवात झाली आहे.
तर याचबरोबवर अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार असून यामध्ये कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, करण जोहर, रोहित शेट्टी, वरुण धवन, नताशा दलाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी येणार असल्याचे समजते.