Home » रंगकर्मींनो तयार व्हा, रंगमंच दणाणून सोडायला..! अहमदनगर महाकरंडक येत आहे!

रंगकर्मींनो तयार व्हा, रंगमंच दणाणून सोडायला..! अहमदनगर महाकरंडक येत आहे!

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणारी, भव्यदिव्य पारितोषिके असलेली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक २०२२ – रंगभूमीची रणभूमी “उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा.” अहमदनगरमध्ये १२ ते १६ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.


अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा झी-मराठी च्या सहयोगाने अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात पार पडणार आहे. राज्यातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुली असेल अशी माहिती अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.

श्री. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, “स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आणि लाभत आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची उत्सुकता असते.

सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदीं या स्पर्धेला आत्तापर्यंत पाहुणे म्हणुन लाभले आहेत. तर केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हाणे विकास कदम, मुक्ता बर्वे, विनोद लवेकर हे परिक्षक म्हणून लाभलेले आहेत.

दि.१२ ते १६ जानेवारी २०२२ दरम्यान अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असुन १ डिसेंबर २०२१ ते २० २०२१ डिसेंबर पर्यंत www.mahakarandak.com ह्या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.

अहमदनगर महाकरंडकच्या वाढत्या प्रसिद्धीची दखल मराठी वाहिन्यांनीदेखील घेतलेली आहे. झी-ग्रुपच्या झी-मराठी या मराठी वाहिनीचा यावेळी महाकरंडकात सहयोग असणार आहे. त्यामुळे यावेळीची स्पर्धा अधिकच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी असेल असे अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांना अधिन राहुन स्पर्धेच आयोजन करण्यात येणार असुन आय लव्हनगर च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेला ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर म्हणून १ ओटीटी तसेच डिजीटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-अप’ आणि ‘खासरे टीव्ही’ असल्याचे महावीर प्रतिष्ठानचे हर्षल बोरा यांनी सांगितले.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी ९६०७७००८०० या क्रमांकावर अथवा विवेक जोशी : ७२७६३५५१४८, सौरभ कुलकर्णी : ९०२८१७१४४१ यांच्याशी संपर्क साधावा.

Glimpse of Ahmednagar Mahkarandak (links) –
अहमदनगर महाकरंडक २०२० – https://youtu.be/FcUH49x5ZF8
अहमदनगर महाकरंडक २०१९ रंगभूमीचे सप्तपर्व – https://youtu.be/RDfxA9Ru2x0

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!