विद्रोही साहित्य संमेलनाच्या विचारयात्रेला सुरवात

नाशिक । प्रतिनिधी

केटीएचएमच्या प्रांगणात विद्रोही साहित्य संमेलनाला सुरवात झाली असून संमेलनाच्या उदघाटनापूर्वी विचारयात्रेला प्रारंभ झाला.

मविप्र च्या अभिनव शाळेतल्या महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत आजपासून संविधान सन्मानार्थ विद्रोही साहित्य संमेलनाला सुरवात झाली आहे. उदघाटनाच्या सुरवातीला विचारयात्रेला सुरवात झाली. हुतात्मा स्मारकातून या विचारयात्रेला प्रारंभ झाला. यात अनेक साहित्यिकांसह नागरिक सहभागी झाले असून विविध लोककला सादर करीत विचार यात्रा संपन्न होत आहे.

यामध्ये नंदुरबार येथीलही काही आदिवासी बांधवानी सहभाग होत लक्ष वेधून घेतले. यावेळी आदिवासींचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा कोंबडा देखील विचार यात्रेत सहभागी असल्याचे दिसून आले.