कोहलीचा ‘विराट’ विक्रम .! अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू..

By चैतन्य गायकवाड |

गेल्या अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट शांत आहे. या कालावधीत त्याने एकही शतक (centuri) झळकावलेले नाही. पण तरीही त्याच्या चाहत्यांमध्ये (fans) तो दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होताना दिसत आहे. विराट कोहलीने मैदानाबाहेर एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीची समाजमाध्यमांवर क्रेज वाढलेली दिसत आहे. इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू म्हणून विराटच्या नावावर ‘विक्रम’ झाला आहे. त्याचे इंस्टाग्रामवर तब्बल २०० मिलियन म्हणजेच 20 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहे.

हा ‘विक्रम’ नावावर करणारा पहिला क्रिकेटपटू .. इंस्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोअर्स असलेला विराट हा पहिलाच क्रिकेटपटू आहे. इतकेच काय तर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या टॉप-5 क्रिकेट खेळाडूंमध्ये सर्वच खेळाडू हे भारतीय आहे. विराट नंतर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला महेंद्रसिंग धोनी (Mahendrasingh Dhoni) हा क्रिकेटपटू आहे. त्याचे जवळपास ३ कोटी ८३ लाख फॉलोअर्स आहे. त्याच्यानंतर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) क्रमांक येतो. त्याचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जवळपास ३ कोटी ४३ लाख फॉलोअर्स आहे. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा क्रमांक येतो. रोहितचे जवळपास २ कोटी २७ लाख फॉलोअर्स आहे. तर हार्दिकचे जवळपास २ कोटी १५ लाख फॉलोअर्स आहे. या फॉलोअर्सच्या आकडेवारीवरून भारतीय क्रिकेट खेळाडूंची इंस्टाग्रामवर असलेली क्रेज दिसून येते.

तसेच इंस्टाग्रामवर इतके फॉलोअर्स असलेला विराट एकमेव भारतीय व्यक्ती आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा क्रमांक येतो. तिचे जवळपास ७ कोटी ९० लाख फॉलोअर्स आहे. तसेच विराट कोहली हा सर्वाधिक फॉलोअर्स असलेला एकमेव आशियाई व्यक्ती ठरला असून जगातील तिसरा खेळाडू आहे.

जगातील तिसरा खेळाडू .. सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला विराट हा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे तो पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक म्हणजे तब्बल ४५ कोटी फॉलोअर्स आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जादुई फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी आहे. त्याचे जवळपास ३३ कोटी फॉलोअर्स आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोहली आहे. चौथ्या क्रमांकावर फुटबॉलपटू नेमार ज्यूनिअर हा आहे. त्याचे जवळपास १७ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पाचव्या क्रमांकावर बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स हा आहे. त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास १२ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.