टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरूनच येणार का? मनसेचा सवाल

गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगाबाद च्या नामांतरावरून राजकारण चालू असल्याचे बघायला मिळत आहे.शिवसेनाला वारंवार नामांतरच्या मुद्यांवरून विरोधक लक्ष करीत असताना. आता मनसेनेही शिसेनेला धारेवर धरले आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभे नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार असून आता त्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. औरंगाबादयेथील सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या गजाजन काळे यांनी संभाजीनगरच्या मुद्यांवरून मुख्यमंत्र्यांना डिवचत औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी केली आहे.

केली आहे या संदर्भात गजानन काळे यांनी एका व्हिडिओतून शिवसेनेला लक्ष करीत सभेत संभाजीनगर नावाचा केंद्राला प्रस्थाव पाठवल्याचा पेपर दाखवणार का अशा देखील प्रश्न विचारला आहे. गजानन काळे यांच्या व्हिडिओत सुरवातीला “होय, हे संभाजीनगर आहे म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर? म्हणून सभेत घोषणा करायच्या. पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळणार आहे.

मनसेच्या गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना मागच्या टोमणेसभेप्रमाणे सभेच्या या दुसऱ्या अंकाच्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा बारामतीवरुन येणार आहे? हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न आहे” असे म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता औरंगाबाद येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करणार आणि औरंगाबाद नामांतरच्या मुद्यांवरून काही घोषण करणार का आणि सभे नंतरच्या राजकीय प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणत सभेचा उत्साह संचारलेला दिसत असून आता औरंगाबादची हि सभा विशाल सभा होईल असा दव देखील शिवसैनिकांकडून केला जात आहे .