मविआतून मोठी आउटगोइंग होणार? नाशकात महाजनांचे मोठे वक्तव्य

नाशिक : राज्यात रोज नव्या राजकीय घडामोडीचे सत्र सुरु आहे. येईल तो दिवस नव्या मोठ्या दाव्यांनी भरलेला असतो. अशात विरोधाकांचची डोकेदुखी वाढवणार दावा आता नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी केले आहे. आगामी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे १० ते १२ आमदार फुटणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला होता. इतर पक्षातल्या १० ते १२ आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. त्यांच्या या दाव्याला महाजांनी दुजोरा दिला आहे.

राज्यात कधीही काहीही घडू शकतं, हे मोठे वक्तव्य गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केले आहे. ‘काँगेसमध्ये आताच दोन गट पडले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि एक गट विरोधात आहे. त्यामुळे हे लोक काँग्रेसला कंटाळले असून मविआ चे तीन तेरा वाजले आहे. अशात कोण केव्हा कोण बाहेर पडेल सांगता येत नाही. मविआतील इतर पक्षाची अवस्था शिवसेना सारखी होईल’, असा दावा महाजनांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे १० ते १२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. इतर पक्षातल्या १० ते १२ आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. मात्र त्यांनी पक्ष कोणता याबाबत गुप्त ठेवले. अशात आज नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी मविआतील इतर पक्षाची अवस्था शिवसेना सारखी होईल’, असा दावा करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असून. राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेवढा मोठा गुन्हेगार तेवढे मोठे स्वागत..!

ईडी आणि सीबीआयकडे कुठलेही ठोस पुरावे आढळले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १८ महिन्यांनंतर नागपूरला येत आहेत. राष्ट्रवादीतर्फे मिरवणूक काढून त्यांच्या जंगी स्वागताची तयारी झाली. ‘अनिल देशमुख यांचे स्वागत होत असेल तर यात नवीन काही नाही. या आधीही असे झाले आहे. जेवढा मोठा गुन्हेगार तेवढे मोठे स्वागत, असा घणाघाती टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. दरम्यान भाजप सरकारने सुडाचे राजकारण केले, असे शरद पवार बोलत असतील तर न्यायालयाने एवढ्या दिवस अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कोठडीत ठेवले नसते,’ असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.