Home » नाशिक पोलीस आयुक्तांच्या जाचाला कंटाळून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक पोलीस आयुक्तांच्या जाचाला कंटाळून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

विधानभवनाबाहेर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून नाशिक पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळेच आपण आत्मदहन करत असल्याचे महिलेने म्हटले आहे. राजलक्ष्मी पिल्ले असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज सकाळच्या सुमारास विधानभवनाबाहेर हि घटना घडली. पिल्ले ह्या विधानभवना बाहेर उभ्या असतांना त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी या महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, नाशिक पोलिसांना सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत असते, तसेच तक्रार दाखल करण्यासाठी जात असतो, मात्र नाशिक पोलीस आयुक्त भेटत नाही, तक्रार दाखल करून घेतली जात नाही, गुन्हेगारांना आश्रय देण्याचे काम नाशिक पोलीस करीत असल्याचे या महिलेने सांगितले.

तसेच नाशिक पोलिसांकडून आमच्या कुटुंबियांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, नाशिक पोलीस आम्हाला न्याय देत नाहीत, यासाठी वारंवार पोलीस आयुक्तांची भेट घेत होते, मात्र पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक टाळत असून या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी विधानभवन येथे आले असल्याचे या महिलेने सांगितले.

पिल्ले या नाशिकच्या असून युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यापूर्वी देखील राजलक्ष्मी यांनी आपल्या पतीसोबत नाशिक पोलीस आयुक्तलयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!