बाप झाल्याच्या आनंदात असतानाच त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर!

नाशिक । प्रतिनिधी

बाप झाल्याचा आनंदात बायकोसह मुलाला पाहायला निघालेल्या युवकावर काळाने झडप घातली. इगतपुरी शहरात ही घटना घडली आहे.

येथील युवक हा बायकोची प्रसूती झाली असता मुलाचे तोंड पाहण्याकऱता जात होता. यावेळी इगतपुरी शहरात आला असतांना एका खड्ड्यात
गाडीचे चाक अडकून खाली पडला. यात त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शहरातील रस्त्याचे काम झाल्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत राहिल्याने एका युवकाचा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक दिवसांपासून इगतपुरीकर या संदर्भात आंदोलन करत आहे. मात्र अद्याप या आंदोलनाला यश आले नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते.