Photo : नाशिकमध्ये साहित्याचा जागर सुरू

नाशिक | प्रतिनिधी
भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन अन् टाळ-मृदंगाच्या तालावर अखंड हरिनामाचा गजरा सह साहित्याची पंढरीत सारस्वतांच्या महामेळ्याने सकाळचे वातावरण भारावून गेले.

आजपासून नाशकात साहित्याच्या जागरास सुरवात झाली असून सकाळच्या सुरवात ग्रंथदिंडीने झाली. संमेलनाची आस घेऊन निघालेल्या या ग्रंथ दिंडीने नाशिककर आनंदित झाले.

कुठे टाळ मृदंग तर लेझीमचा ताल आणि ढोल ताशांच्या गजरात नाशिकनगरी दुमदुमली होती. कैक वर्षांनी नाशिकमध्ये भव्य साहित्यिकांचा सोहळा नाशिककर अनुभवत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळत आहे.

या ग्रंथदिंडीत पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ वीणा वादन करीत उपस्थितांना भुरळ घातली. या ग्रंथदिंडीत विविध विषयांवरील चित्र रथ असून शालेय विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. त्याचबरोबर नाशिककरांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटून दिंडी मार्ग सजविला होता.