Video : संमेलनाच्या पहिल्या दिवशी बासरीचे सप्तसुर निनादले गोल्फ क्लब वर..!

नाशिक | प्रतिनिधी
मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी नाशिक नगरी आज भक्तीमय वातावरणाने दुमदुमली आहे. साहित्यिकांचा महामेळा तीन दिवस नाशकात भरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=wsCoOCmaspw

दरम्यान संमेलनाच्या एक दिवस अगोदर पावसाने तारांबळ उडाली होती. अखेर संमेलनाच्या उदघाटनाच्या दिवशी कृपा दृष्टी दाखवत उघडीप दिल्याने सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

एकीकडे साहित्य संमेलनाचा जल्लोष तर दुसरीकडे गुलाबी थंडीने ही नाशिककरांना भुरळ पाडली आहे. या गुलाबी थंडीत नाशिककरांची सुरेख सकाळ एक अवलिया करतोय. सुनील बच्छाव, हे गोल्फ क्लब मैदानावर बसून सुंदर बासरी वादन करत असून याचा आनंद नाशिकची साहित्यमय सकाळ घेतांना दिसून येत आहे.