Home » भीषण अपघातात १ ठार; मृताच्या नातेवाईकांचा उड्डाणपुल ठेकेदारावर संताप

भीषण अपघातात १ ठार; मृताच्या नातेवाईकांचा उड्डाणपुल ठेकेदारावर संताप

by नाशिक तक
0 comment

नाशिक : घोटीजवळ अपघातात १ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी येथील सिन्नरफाटा येथे आज सायंकाळच्या सुमाराला एका ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवरील एक व्यक्ती जागीच ठार झाला. मात्र उड्डाणपुल ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. नातेवाईकांनी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.

मुंबई आग्रा महामार्गांवरील घोटी येथील सिन्नरफाटा येथे आज सायंकाळच्या सुमाराला एका ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवरील एक व्यक्ती जागीच ठार झाला. यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान उड्डाणपूल ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी आणि आदिवासी नेत्यांनी घेतला आहे. घोटी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पिंपळगाव भटाटा येथील रामदास भावडू शिद हा इसम जागीच ठार झाला आहे. नाशिककडे जातांना विठ्ठल कामत हॉटेलजवळच्या मोरीजवळ अगदीच अरुंद रस्ता ठेवला आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मयताचे नातेवाईक, ग्रामस्थ यांच्यासह अनेकांनी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!