Home » बापरे! इटलीहून अमृतसरला येणारी फ्लाईट बनली कोरोनाची हॉटस्पॉट

बापरे! इटलीहून अमृतसरला येणारी फ्लाईट बनली कोरोनाची हॉटस्पॉट

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
देशात गेल्या दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढत आहे. ओमिक्रॉनचा अनेकांना संसर्ग होत आहे. आता एअर इंडियाच्या इटली-अमृतसर फ्लाइटमध्ये जवळपास १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व प्रवासी अमृतसर विमानतळावर उतरले होते. याची माहिती विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली आहे.

अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून निघालेले एअर इंडियाचे विमान उतरले. या विमानातील १२५ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानात एकूण १८० होते. करोना संसर्ग झालेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने घेऊन ते ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे, अमृतसरचे पोलीस उपायुक्त गुरप्रीस सिंगही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पंजाबमध्ये कोरोनाची बिघडलेली स्थिती पाहता तिसऱ्या लाटेचा आवाज येऊ लागला आहे. बुधवारी २४ तासांत चार संक्रमितांचा मृत्यू झाला, तर १८११ नवीन बाधित आढळले आहेत. संसर्गाचे प्रमाण ७.९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. पंजाबमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बूस्टर डोसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सरकार १० जानेवारीपासून बूस्टर डोस लागू करणार आहे. पहिल्या टप्प्यात यामध्ये केवळ आरोग्य सेवा, आघाडीचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. दुसऱ्या डोसच्या नऊ महिन्यांनंतरच बुस्टर डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!