नाशिक । प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यावतीने नायलॉन मांजाच्या विरोधात शालेय विद्यार्थ्यांना पतंग, साधा दोरा, मास्क व सॅनिटाझरचे वाटप करून नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली आहे.
पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होवून नागरिक तसेच पक्षी जखमी होतात यात काहीना तर आपला जीव देखील गमवावा लागतो. असे अपघात रोखण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सुती दोऱ्यापासून बनविल्या जाणाऱ्या मांजाचा वापर वापर करावा. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना चिनी बनावटीचा नायलॉन मांज्याचे दुष्परिणाम यावर प्रबोधन करत युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी युवक पदाधिकाऱ्यांसमवेत शालेय विद्यार्थ्यांना पतंग व साधा दोराचे वाटप करून पर्यावरणाचे संरक्षण हे आपले कर्तव्य असल्याने नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ मुलांसमवेत घेतली.
नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. याचे दुष्परिणाम सामान्य माणासांप्रमाणेच पशुपक्षांनाही भोगावे लागत आहेत. हा नायलॉन मांजा विकत घेतलाच नाही तर त्याची विक्री थांबेल याकरिता जनजागृतीची गरज असून त्याची सुरवात शालेय मुलांपासून करण्यात आली.
पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात होतात यामध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर पक्षांना देखील याचा मोठा त्रास होतो अनेक पक्षी यात जखमी होतात तसेच त्यात त्यांचे प्राण देखील जातात. खैरे यांच्या संकल्पनेतून शाळे मधील मुलांना पतंग व साधा दोराचे वाटप करण्यात येत असून यातून समाजामध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची जनजागृती केली जात आहे. पालकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले आहे.
यावेळी मधुकर जेजुरकर, सुनिल सूर्यवंशी, सुरेश नेटावटे, कमलाकर गोडसे, विजय साळवे, संतोष जगताप, किरण पानकर, संतोष जेजुरकर, जयवंत गोडसे, दीपक इंगळे, शकील शेख, किरण सरदार, लाला जाधव, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, भैयाजी हिरे, मयूर पाळदे, संतोष पुंड, प्रकाश भोर, रोहित जाधव, अमर गोसावी, प्रकाश आव्हाड, गौरव पाटील आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.