देवळा तालुक्यात गारठून १६ जनावरांचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यांत काल दिवसभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर देवळा तालुक्यात लहान मोठी अशी एकूण पंधरा ते सोळा जनावरे दगावली आहेत.

नाशिक जिल्ह्यांत कालपासून ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू होता. त्यामुळे प्रचंड थंडी वाढली होती. अशातच देवळा तालुक्यातील दहिवड शिंदेवाडी – भवरी मळा येथील १६ मेंढ्या थंडीने मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. येथील कौतिक प्रभाकर शिंदे यांच्या ०४ मेंढ्या, ०२ कोकरु, ०२ बकरी, ०१ वासरू दगावले आहे. तर येथीलच दादाजी देवरे यांच्या सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि गारठ्याने जनवारे दगावल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून नुकसानग्रस्त मेंढपाळाला मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.