स्वागताध्यक्ष फक्त पावभाजी खाऊ घालायला करतात का?

नाशिक | प्रतिनिधी
साहित्य संमेलन म्हटलं की कथा, कविता, परिसंवाद आदींचा उहापोह दिसतो. मात्र अलीकडे अलीकडे साहित्य संमेलनात देखील राजकारण येत असल्याने संमेलन अळणी होत चालल्याची टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

https://youtu.be/lYyB-qEykGU

ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, संमेलनात राजकारण घेऊन चालत नाही. एकेकाळी मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण थेट प्रेक्षकांमध्ये बसले संमेलनाचा इतिहास आहे. मात्र पाहुण्यांचे स्वागत करायचे सोडून स्वागताध्यक्ष फक्त पावभाजी खाऊ घालायला करतात का? अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

पक्षभेद न आणता, सर्व पक्षांना निमंत्रण दिले पाहिजे, सर्वांना सोबत घेऊन संमेलन होणं गरजेचं असताना भाजपला डावलल जात आहे. निधी चालतो मग भाजपचे नेते का नाही असा सवाल त्यांनी यावेळी आयोजकांना केला. आता यावर आयोजक काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.