शनिवार, जून 3, 2023
घरक्राइम'व्हीआयपी' नंबर देण्याच्या बहाण्याने १९ लाखांना गंडा

‘व्हीआयपी’ नंबर देण्याच्या बहाण्याने १९ लाखांना गंडा

नाशिक । प्रतिनिधी

व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल १९ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विविध कंपन्यांचे फॅन्सी नंबर्स देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले जात आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. मूळ हैदराबाद येथील असणारे फिर्यादी यांना दोघं संशयितांनी फॅन्सी नंबर देण्याचे बहाण्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली होती. अशाप्रकारे तब्बल १८ लाख १९ हजार रुपये फिर्यादीकडून या दोघांनी काढून घेत फरार झाले.

काही दिवसांनी त्यांच्यासोबतचा संपर्क तुटल्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळले. याप्रकरणी त्यांनी सायबर क्राईम पोलीस स्टेशन सायबराबाद या ठिकाणी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. या तपासकामी सायबाराबाद पोलीस थेट नाशिकमध्ये दाखल झाले. सायबाराबाद पोलिसांनी नाशिक पोलिसांना घटनेची माहिती देत तपासास सुरवात केली.

या नुसार नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने कोणताही सुगावा नसताना केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अवघ्या काही तासांत दोघांना अटक केली आहे. कुणाल खैरनार व हेमंत ओसवाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून ते दोघे नाशिकचे राहणारे आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप