Video : स्वतःला कबरमध्ये गाडून घेत अनोखं आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये कब्रस्तानच्या जागेवरून मुस्लिम बांधव आक्रमक झाले असून थेट स्वतःलाच कबरमध्ये अर्धस्वरूपात गाडून घेत मुस्लिम बांधवांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नाशिक भागातील मुस्लिम बांधव कब्रस्तानला जागा मिळावी यासाठी मागणी करीत आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र या जागेच्या विषय अद्याप मार्गी लागलेला नव्हता.

https://youtu.be/JMUuaM8LqVI

दरम्यान आज नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी पुन्हा जागेच्या पाहणीसाठी परिसरात आले होते. मात्र पुन्हा नवीन नाशिक मधील मुस्लिम बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत कब्रस्तानच्या जागेच्या विषयावरून आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी स्वतःला कबर मध्ये गाडून घेत अनोखे आंदोलन केले आहे.

जोपर्यंत आयुक्त येत नाही, विभागीय अधिकारी याकडे लक्ष देऊन कब्रस्तानचा विषय मार्गी लावत नाही तो पर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.