Home » आई वडील गेले शेतावर, घरी १९ वर्षीय मुलाची आत्महत्या

आई वडील गेले शेतावर, घरी १९ वर्षीय मुलाची आत्महत्या

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील भावडे शिवारात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या १९ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोहित निवृत्ती वायचळे (१९) रा. मुंगसरे ता.नाशिक जि.नाशिक असे आत्महत्या केलेल्या युवकाच नाव आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मूळचे मुंगसरे ता.जि.नाशिक येथील वायचळे कुटुंबीय कामानिमित्त काही वर्षांपासून देवळा तालुक्यातील भावडे शिवारात वास्तव्यास आहेत. आज दुपारी साडे बारा वाजता आई-वडील शेतात कामाला आणि भाऊ बाहेर गेलेला असतांना १९ वर्षीय रोहितने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा भाऊ घरी आला असता त्याला रोहित घरात लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

कुटुंबियांनी खाली उतरवून उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

मयत रोहित वायचळे हा गोदावरी हॉटेलवर कामाला होता. या युवकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम राठोड आदी करत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!