नाशिकचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले!

नाशिक | प्रतिनिधी

रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण जगभरावर उमटताना दिसत आहेत. अशातच नाशिकमधील दोन विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) वाद आता चिघळला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आज युक्रेनविरोधात युद्ध (War) पुकारले आहे. यामुळे भारत सरकारने (Indian Government) युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर (Helpline Number) जारी केला आहे.

दरम्यान, नाशिकमधील (Nashik) दोन विद्यार्थी (Students) युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती मिळते आहे. अदिती देशमुख (Aditi Deshmukh) आणि प्रतिक जोंधळे (Pratik Jondhale) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी नाशिकरोड (Nashikroad) व गंगापूर रोडचे (Gangapur Road) रहिवासी असल्याचे समजते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

हे दोन्ही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासासाठी युक्रेनमध्ये गेल्याचे समजते. रशिया-युक्रेन मध्ये वाद पटल्यानंतर या मुलांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून जिखाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची माहीती शासनाला दिली आहे.

दरम्यान हे दोघेही सुरक्षित असून त्यांना बँकर्समध्ये सुरक्षित हलवल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहितीदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.