नाशिक । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कनिष्ठ सहायक लिपिक या संवर्गातून वरिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गात २१ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली.
पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी महिला, अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड आदी उपस्थित होते.
या पदोन्नती प्रक्रियेसाठी वरिष्ठ सहाय्यक भास्कर कुंवर, मंगेश केदारे, प्रमोद ढोले, राहुल देवरे, कानिफ फडोळ, किशोर पवार, साईनाथ ठाकरे,जगदीश कर्डक, दत्तात्रय बेलेकर, प्रमोद जाधव आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटना व सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ व शाल देत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे आभार व्यक्त केले.