विनापरवाना फलक लावल्याप्रकरणी नगरसेवक दोंदे यांच्यावर गुन्हा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर मोठे शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक राकेश दोंदे, मेघराज श्याम नवले यांच्यावर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. दरम्यान भाजपचे नगरसेवक दोंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याशी संबंधित फलक आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय लावले होते.

या प्रकरणी दोंदे आणि नवले यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.