२२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरक्षकांना कोरोनाची लागण

सुट्टीवरून परतलेल्या २२ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरक्षकांचा कोरोना चाचणी चा अहवाल पॉसिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.
नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रात २२ प्रशिक्षणार्थी पाेलिस उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दिवाळी या सणाला सुट्टीत प्रशिक्षणार्थी आपापल्या गावी गेले होते.सुट्टी संपल्यानंतर गावी गेलेलले प्रशिक्षणार्थी परत आल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली .या कोरोना चाचणीत 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवालात समोर आले आहे.या कॉरोन बाधित प्रशिक्षणार्थी पाेलिस उपनिरीक्षकांवर महापालिकेच्या बिटको रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.