सिटी बस मध्ये घुसून महिला आणि तिच्या तिघा साथीदारांकडून कंडक्टर आणि ड्रायव्हर ला मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.ही सिटी बस बोरगड वरून नाशिककडे येत असताना हा प्रकार घडला आहे.
गाडीला ओव्हरटेक का केला ? या कारणावरून जाब विचारत, एक महिला आणि तिच्या सोबत असलेल्या तिघा जणांनी बसमध्ये घुसून कंडक्टर आणि बस चा ड्राइव्हर यांना मारहाण केल्याच पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.हि संपूर्ण घटना बस मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.या बाबत नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आणि तिच्या तिघा साथीदारां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, म्हसरूळ पोलीस या बाबत अधिक तपास करत आहे.तर सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आली आहे.