श्रद्धांजलीसाठी चांगले फोटो ठेवा अस स्टेटस टाकत…तरुणाची आत्महत्या

वॉट्सअप स्टेटसला चांगले फोटो ठेवा असे स्वतःच्या वॉट्सअप अकाउंटला स्टेटस ठेवत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यात समोर आली आहे.


नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगाव इथल्या २२ वर्षीय युवकाने आपल्या श्रद्धांजलीचे वॉटसअप स्टेटसला चांगले फोटो ठेवा असे व्हॉट्सअपवर स्टेटस लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.येथील विशाल उत्तम शिंदे या बावीस वर्षीय युवकाने गळफास घेण्याच्या आधी आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ,”आपण जग सोडून जात असल्याचे स्टेटस ठेवले होते”. मित्रांना उद्देशून त्याने सगळ्यांवर प्रेम असल्याचे या मेसेज मधून त्याने लिहिले आहे. काही राग असेल तर मनात ठेवू नका, सगळे आनंदी रहा, मी चाललो असून भावपूर्ण श्रद्धांजली साठी सर्वांनी तुमच्या स्टेट्सला माझे चांगले फोटो ठेवा असं लिहिले,आणि त्यानंतर त्याने आपल्या जुन्या घराच्या आड्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.


विशालचे असे स्टेटस पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी व नातेवाईकांनी सर्वांनी मिळून त्याचा शोध घेतला.मात्र,तो जुन्या घरात असेल असे कुणालाही शंका आली नव्हती. बराच वेळ शोध घेतल्यानंतर जुन्या घरातील आड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला,या घटनेने सिन्नर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,तर या बाबत सिन्नर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.