आता लस नाही तर रेशन नाही ? पालकमंत्री,छगन भुजबळ

नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे.तब्बल १६ लाख नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस देखील घेतला नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.जिल्ह्यातील लसीकरण अद्याप देखील ५० टक्यांच्या आत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात हि टक्केवारी वाढली नाही तर कडक पाऊल उचलावे लागतील ,असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

औरंगाबादमध्ये देखील कोरोना लसीकरणाची टक्केवारी कमी झाल्याने औरंगाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी काही कडक पाऊल उचलत ,लस नाहीतर पगार नाही ,लस नाहीतर रेशन नाही ,लस नाहीतर पेट्रोल नाही असे कडक निर्णय लागू केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यात देखील कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढली नाहीतर औरंगाबाद पॅटर्न नाशिकमध्ये देखील राबवावा लागेल असा इशारा पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे.असे कडक निर्बंध नको असेल तर नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे येऊन प्रशासनाला मदत करण्याचे आव्हान भुजबळांनी केले आहे…