बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत मारली असती

२०२४ च्या निवडणुकांच्या अनुषंगाने दंगली घडवाव्या असा भाजपचाच प्रयन्त असलयाचे वक्तवव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते.त्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देत त्रिपुरात मस्जिद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मालेगाव मध्ये उमटणे यापेक्षा संजय राऊत यांचं वक्तव्याची मला खूप कीव येते, राजकारणासाठी किती लाचार असल्याचे म्हणत ,”आज स्वर्गीय बाळासाहेब जर जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती “असं वक्तव्य भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केले आहे.

राज्य करा, मुस्लिमांची मत मिळवा कोण नाही म्हणतंय परंतु पाच टक्के मुस्लिम गडबड करतात, 95 टक्के नाही.मालेगाव मध्ये,नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करणे यावर पूर्वी सारखी टीका करा मुस्लिम मतांची काळजी करू नका असा खोचक सल्ला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिला आहे.ज्या वेळी 5 टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार ? तुम्हाला झोपताना उठताना बीजेपी दिसते असे देखील पाटील यांनी म्हंटले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्ही सुरू केला, आरोग्य पेपर आम्हीच फोडला, शेतकरी पैसे आम्ही थांबवले
असे आरोप आमच्यावर करून हि काय चेष्टा चालावी आहे,सामान्य माणसाला हे कळत नाही का? जर तुम्हाला वाटते आहे कि यात भाजपचाच हात आहे तर तुम्ही तिघे पक्ष मिळून भाजपचा हात कापून काढा ना,तुम्हाला कोणी अडवले आहे का,याचाच अर्थ तुम्ही तिघे दुबळे असून आम्ही श्रेष्ठ असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.


तर संजय राऊत यांनी राज्यसरकार ने डिझेल पेट्रोलचा वॅट कमी करावा यासाठी आंदोलन करावे असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे.आज नाशिक दौऱ्यावर असताना ते बोलत होते.