५७ एस टी कर्मचारी निलंबित,प्रशासन आक्रमक

विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजून सुरूच आहे.या संपात सहभागी st कर्मचाऱ्यांवर आता महामंडळाने निलंबनाची कार्यवाहीचा बडगा उचलला आहे.या कार्यवाईत आतापर्यंत 57 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून एसटी महामंडळ प्रशासन देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

या कार्यवाईमुळे आता st कर्मचारी संतप्त झाले असून हे आन्दोलन आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहे.गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेल्या या संपामुळे एसटीचे देखील कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.हा संप जर असाच सुरु राहिला तर st महामंडळाला पुढे जाऊन देखील मोठा फटका बसेल हे मात्र नक्की.नाशिक विभागात 13 डेपो,एक वर्कशॉप बंद तर 5300 कर्मचारी हे संपात सहभागी झाले आहे.ज्याचा महामंडळ नाशिक विभागाला देखील मोठा फटका बसला आहे.येत्या काळात जर हा संप असाच सुरु राहिला तर महामंडळाच्या नुकसान बरोबरच नाहक प्रवाश्यांचे देखील मोठे हाल होणार आहे.या सगळ्या मुद्यावरून परिवहन मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे,किमान या बैठकीत तरी तोडगा निघणे अपेक्षित असून या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर हा संप आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहे.