नाशिक प्रतिनिधी :
पेठ वरून नाशिक जिल्हा शासकीय रुगणालयात प्रसूती साठी आलेल्या महिलेला येथील कर्मचाऱ्याकडून गैर वर्तन देत मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केलंय.दरम्यान संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी श्रमजीवी संघटनेकडून जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पेठ वरून पहाटे ४ वाजेच्या सुमारास हिरा कैलास गारे नावाची महिला ही डिलिव्हरी साठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती व त्यावेळी सदर महिलेला कळा सुरू झाल्या होत्या,दसरम्यान कामावर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने या गरोदर महिलेला बाथरुम मध्ये जाण्यास अडवत , तिला भिंतीवर लोटून देत मारहाण करत तुझ्यावर पोलिस केस करेन अशी धमकी दिल्याचा आरोप सदर गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
तसेच डिलिव्हरी झाली तेंव्हा कोणतेच डॉक्टर हजर नव्हते, बाळ खाली पडल्या मुळे,बाळाच्या डोक्याला मार लागल्याचा आरोप देखील पीडित महिलेने केला आहे.या घटनेत मात्र दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला आहे.तर सदर सफाई कामगार व हलगर्जी पणा करणारे डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन श्रमजीवी संघटनेकडून नाशिकच्या जिल्हा शैल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहे..तर या गटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून या समितीच्या चौकशीत जे समोर येईल त्यानुसार कार्यवाई केली जाणार असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी म्हंटलं आहे…