नाशकात बसची तोडफोड.

नाशिक प्रतिनिधी :

तब्बल चार दिवसांनंतर शिवशाहीची पहिली बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे.नाशिकहून २० ते २५ प्रवाशी घेऊन हि बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे.गेल्या काही दिवसानापासून st कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागणीसाठी संप सुरु आहे.आज संप सुरु असताना देखील हि बस नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकाहून प्रवाश्यांना घेऊन रवाना झाली आहे.

त्यातच दुसरीकडे मात्र पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन देऊन देखील बंदोबस्त न मिळाल्याने शिवशाही व्यवस्थापन नाराज झाल्याचे दिसून आले.त्यामुळे बंदोबसता शिवाय नाशिकहून पुण्याकडे २ बस रवाना झाल्या आहेत.असे असताना मुंबई नाका बस स्थानकात काही अज्ञातांकडून बसची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

दुचाकीवर आलेल्या अज्ञातांकडून उभ्या असलेल्या बसवर दगडफेक करत बसच्या काचेची तोडफोड करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास करत आहेत.