Home » हताश ST महिला कर्मचाऱ्याच टोकाचे पाऊल.

हताश ST महिला कर्मचाऱ्याच टोकाचे पाऊल.

by नाशिक तक
0 comment

निलंबनाच्या कारवाईमुळे महिला एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयन्त केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासुन आपल्या मागण्यांसाठी st कर्मचारी यांचा संप सुरु आहे,या संपामुळे st महामंडळाचे मोठे नुकसान देखील होत आहे.यामुळे आता st महामंडळाकडून आंदोलनकर्त्यांवर निलंबनाची कार्यवाइचा बडगा उचलण्यात आलाय.या संपात सहभागी महिला कर्मचारी सुकेशनी एनगंडे यांना देखील st महामंडळाकडून निलंबित करण्यात आले होते.त्यामुळे निराश होऊन या महिला कर्मचारीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यावेळी एनगंडे यांच्या लहान बहिणीने वेळीच तत्परता दाखवल्याने सुकेशनी एनगंडे या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले आहे.आत्महत्या करतेवेळी या महिलेने सुईसाईड नोट देखील लिहिली होती.जर निलंब झाले तर उदरनिर्वाह करायचा कसा ? असा सवाल या महिलेसमोर उभा राहिला होता. या विचाराने हताश होऊन सदर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून या महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.वेळीच बहिणीला सदर बाब लक्षात आल्याने तिने सुकेशनी यांचा हात धरून त्यांना खाली खेचत त्यांचा जीव वाचवला.सुकेशनी ह्या ST कंडक्टर या पदावर कार्यरत आहे.त्यामुळे येत्या काळात असे प्रकार घडू नये यासाठी ST प्रशासनाने वेळीच ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणे गरजेचे आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!