दोन बिबटे एकाच ठिकाणी.

नाशिक। प्रतिनिधी

इगतपुरी येथे एकाच दिवसात दोन बिबटे जेरबंद झाले आहे.काल सकाळी एका मादी बीट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.त्यानंतर अवघ्या काही तासात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेबंद झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले आहे.आज पुन्हा इगतपुरी येथील शिवाजी नगर परिसरात बिबट्या जेरबंद झाला आहे.

अवघ्या बारा तासांत दोन बिबटे जेरबंद झालेय.आपल्या बछड्याला शोधण्यासाठी मादी बिबट्या हा या परिसरात वावरत होता.बिबट्याचा वावर सुरु असताना डरकाळ्यानी परिसर दणाणून गेला होता.काल बिबट्याचा बछडा जेरबंद झाल्याने आज या बछड्याच्या शोधात आलेली मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.त्यामुळे वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.असे असले तरी बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर इगतपुरी येथील मानवी वस्तीवस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढल्याचे समोर आल्याने नागरिक भयभीत झाले असून वनविभागाची चिंता वाढली आहे.

मागच्या काही दिवसांपासून इगतपुरी दिंडोरी,निफाड,पेठ,कळवण या भागांत बिबट्यांचा वावर वाढला आहे,तर अनेक लहान मुले,नागरिक या बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेचे समोर आले आहे.तर काही जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव देखील गेले आहे.त्यामुळे या भागात नागरिकांनी देखील रात्रीच्यावेळी वावरत असतांना सावधानगिरी बाळगणं गरजेचे आहे.असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले असले तरी नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या बिबट-मानव संघर्ष रोखण्याचं एक मोठं आव्हान वनविभागसमोर उभे ठाकले आहे.