शनिवार, जून 3, 2023
घरक्राइमबोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थीनीची आत्महत्या

बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थीनीची आत्महत्या

नाशिक । प्रतिनिधी

हरसूलजवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत ९ वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रोहिणी बापू वड (वय १५, रा. खडकओहोळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत अधिक महिती अशी कि, बोरीपाडा आश्रम शाळेत रोहिणी शिकायला होती. सध्या बस बंद असल्याने येण्याजाण्याचे साधन नव्हते. यामुळे ती इतर मुलीसोबत वसतिगृहात राहत होती. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने दुपारच्या जेवणासाठी सर्व मुली निघाल्या होत्या. मात्र, रोहिणी त्यांच्यासोबत गेली नाही. तिने तिच्या मैत्रिणींना जेवण घेऊन येण्यास सांगितले.

काही वेळाने रोहिणीच्या मैत्रिणी जेवण घेऊन तिला देण्यास आल्या असता, दरवाजा बंद होता. यावेळी पर्यटन करूनही रोहिणीने दरवाजा न उघडल्याने तिच्या मैत्रिणीने वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा रोहिणी या जगात नव्हती. रोहिणीने रूमच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलीस पाटील व पोलीस उपनिरीक्षकांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनासाखील हवालदार बाळू राऊत, एकनाथ पगार, सुनील तुंगार हे करत आहेत.

RELATED ARTICLES

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप