महाराष्ट्र अजूनही जातीपातीच्या विळख्यात : राज ठाकरे

नाशिक । प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा सरळ सोपा नसून यामागे राजकारण आहे, जोपर्यंत महाराष्ट्र जातीपातीच्या विळख्यातून बाहेर येणार नाही तो पर्यंत अशाच अडचणींना समोरे जावे लागेल, असे मत राज ठाकरे यांनी मांडले.

ते नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, ‘अचानक ओबीसींचा मुद्दा आला कसा? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेले हे प्रकरण आता न्यायालयात अडकले असून हे दिसतं तसं सरळ प्रकरण नाही. मी अनेकदा बोललो आहे कि, जोपर्यंत आपण जातीपातीतून बाहेर येणार नाही. तोपर्यंत चांगला महाराष्ट्र मिळणार नाही, असे मत यांनी यावेळी व्यक्त केले.

एसटी कर्मचाऱ्यांबाबत ते म्हणाले कि, जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे. एसटीच्या संपाची माहिती घेतली आहे. एसटी कर्मचारी यावेळी युनियन सोडून एकत्र आले आहेत. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, अशी थेट विचारणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. दरम्यान या संदर्भात आपण मुख्यमंत्र्याना पत्र पाठविणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी राज ठाकरे यांनी एसटी संपासह, परीक्षा रद्दचे प्रकरण, एमआयएम पक्षाने काढलेली तिरंगा रॅली, रजा अकादमी दंगल, ओबीसी आरक्षण,
राहुल गांधींचे विधान यांसारख्या अनेकविध विषयांवर स्पष्ट भाष्य केले.