कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला नाशकात प्रत्युत्तर

नाशिक : काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या (Maharashtra truck vandalized in Karnataka) गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद नाशिकमध्ये (Nashik) उमटले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी या मुद्द्यावरून आंदोलन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे.कर्नाटकात महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आल्याने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँक समोर आंदोलन (Protest in front of Karnataka Bank in Nashik) करत बँकेच्या कर्नाटक बोर्डला काळे फासून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काल कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. तर नाशिकमध्ये स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून आंदोलन कर्त्यांकडून भगवे झेंडे घेऊन, काळे कपडे परिधान करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला आहे. जर कर्नाटक येथील संघटनाने आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिकधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज्य संघटनाकडून देण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काल कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्यानंतर हा वाद अजूनच भडकला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी कर्नाटकात झालेल्या या हरकतीचा निषेध करण्यात आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ सर्वप्रथम पुण्यात पडसाद उमटले. पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेकडून कन्नडिकांविरोधात आंदोलन करण्यात आले होते.पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेकडून कन्नडिकांविरोधात आंदोलन करत कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली होती. तर आज नाशिकमध्ये पडसाद उमटले आहे.

कर्नाटकमध्ये केलेल्या उच्छादाला प्रत्युत्तर देत नाशिकमध्ये आक्रमक झालेल्या स्वराज्य संघटनेणे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँक समोर आंदोलन केले आहे. काल कर्नाटकात महाराष्ट्र राज्यातील ट्रकच्या नंबर प्लेट ला लाथा मारण्यात आल्या तर आज नाशिकमध्ये कर्नाटक बँकेच्या कर्नाटक बोर्डला काळे फासून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भगवे झेंडे घेऊन, काळे कपडे परिधान करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला आहे. जर कर्नाटक येथील संघटनाने आपली दडपशाही थांबवली नाही तर आंदोलन अधिकधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज्य संघटनाकडून देण्यात आला आहे.

कर्नाटकात तोडफोड करण्यात आलेल्या ट्रकवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होते. दरम्यान आज नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहे.