Home » नाशिककरांना! बाराशे रुपयांचा झाडू खुणावतोय !

नाशिककरांना! बाराशे रुपयांचा झाडू खुणावतोय !

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यामध्ये आता आम आदमी पार्टीचा देखील समावेश झाला आहे. आगामी नाशिक महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा आआपा लढणार असल्याची माहिती राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी दिली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचा धुरळा लवकरचं उडणार असून, यासाठीची मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून सुरु आहे. शहरात गेल्या वर्षभरापासून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे त्याचबरोबर आम आदमी पार्टी देखील मेहनत घेत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे म्हणाले कि, नाशिकमधून यंदा महापालिकेचा बिगुल आम आदमी पक्ष वाजविणार असून यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. आम्ही नाशिकमधील १३३ म्हणजेच सर्वच्या सर्व जागेवर निवडणूक लढविणार आहोत.

आमचा प्रचार सुरु झाला असून यासाठी झाडू रथ तयार करण्यात आला आहे. या झाडू रथाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. हा झाडू संत गाडगे महाराजांच्या भूमीतील आहे. नाशिकच्या २० लाख लोकसंख्येला आमचा बाराशे रुपयांचा झाडू खुणावत असून नाशिकमधील भ्रष्ट व्यवस्थेला नष्ट केल्याशिवाय हा झाडू मागे सरणार नाही, असा निर्वाळीचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. जुन्या नाशकात आज आम आदमी पक्षाचा प्रचार दौरा होता. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, जनतेला सर्वात आधी तुम्ही मालक आहात, याची जाणीव आम आदमी पक्ष करून देईल. आम आदमी पक्ष वोट भी मांग रहा है, और नोट भी मांग रहा है… शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी हे सगळं मोफत देऊन सुद्धा आठ हजारच्या नफ्यात दिल्ली सरकार चालतंय, मग नाशिकमध्ये का नाही होणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महिलांना बस मोफत शिवाय, पाणी पट्टी माफ, घरपट्टी हाफ हा पॅटर्न राबविण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!