Home » कोरोनाला थांबविण्यासाठी ‘हे’ करावेच लागेल : आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

कोरोनाला थांबविण्यासाठी ‘हे’ करावेच लागेल : आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या क्षमतेनुसार राज्यात रोज दोन ते पावने दोन लाखाच्या आसपास आरटीपीसीआर टेस्ट होणे गरजेचे आहे. तसेच अँटीजेन टेस्टवर देखील भर द्यावा लागणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने सरकार खबरदारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. आज सकाळीच मंत्रालयात याबाबत बैठक घेण्यात आली. त्यांनतर राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयाच्या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला . त्यावेळी ते बोलत होते.

दुसऱ्या लाटेत अँटीजेन टेस्टवर भर देण्यात आला होता. त्याचप्रमाणे आताही अँटीजेन चाचणीसह आरटीपीसीआर करण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक शहरातील चौकाचौकात अँटीजेन टेस्टची व्यवस्था करावी. जेणेकरून प्रत्येकाला चाचणी करता येईल. फार्मसी शॉपमध्ये देखील अँटीजेन किट उपलब्ध कराव्यात. तर ओमायक्रोनसाठी लागणाऱ्या एस जीन किट ची सध्या आवश्यकता नसून अँटीजेन टेस्टवर भर देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी गर्दीला थांबवणं गरजेचे आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. येणाऱ्या कालावधीत कार्यान्वित कोविड केअर सेंटरना लागणारे मनुष्यबळ एसडीआरएफकडून दिले जाणार आहे. त्याच बरोबर क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा असणार आहे. तर लसीकरण करण्यावर अधिक भर दिला जाणार असून ज्यांचे लसीकरणचा झाले नाही, त्यानं अधिक कठोर भाषेत समजावून सांगणार आहोत.. त्यांना काहीही करून घायला लावणार असल्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!