नाशिक जिल्ह्यात कडक निर्बंध लागणार, उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी ३२२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात काळ ३२२ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात नाशिक शहर २७६, ग्रामीण ३२, मालेगाव ०२, जिल्हाबाह्य १२ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जून २१ नंतर पहिल्यांदाच ३०० रुग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे.

दरम्यान मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात १०० च्या वर रुग्णाची भर पडत असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे. रुग्णसंख्येने दोनशेच्या टप्पा पार २१६ पोहचली. आणि कालच्या आकडेवारीनंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. गेल्या चोवीस तासांत ३२२ नव्या रुग्णांची भर पडल्याने निर्बंध अधिक कडक होणार का याकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोज करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे जगभरात रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून चिंता वाढली आहे. जिल्ह्यात तीस ते चाळीसवर आलेली रुग्णसंख्या गेल्या खाई काही दिवसांत उग्र रूप धारण करीत करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील रुग्णसंख्येत भर पडत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.