नाशिकमधून तीन मुलींचे अपहरण, हे सत्र थांबणार कधी?

नाशिक । प्रतिनिधी

शहरात मुलींचे अपहरण केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी अंबड परिसरात दोन, तर एक घटना उपनगर परिसरात घडली आहे.

अपहरणाची पहिली घटना उपनगर परिसरात येथे सोमवारी (दि. २८) रोजी घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलीला आईने दूध घेण्यासाठी पाठवले होते. बराच वेळ झाला परंतु ती घरी परत आली नाही. त्यामुळे नातेवाईकांकडे मैत्रिणीकडे विचारपूस करूनही तिचा शोध लागला नाही. यामुळे मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केली.

अपहरणाची दुसरी घटना अंबड येथे घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेची मुलगी काल दुपारी कॉलेजला जाते, असे सांगून राहत्या घरातून गेली. बराच काळ उलटूनही ती घरी परत आली नाही. तिचा नाशिक शहरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यावरून अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

तिसरी घटना अंबड परिसरात घडली. फिर्यादी यांची भाची हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या मामाने अंबड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.