….मग एकलहरेत तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा कसा?

नाशिक । प्रतिनिधी

एकीकडे नाशिकमध्ये विजेची मागणी वाढल्याने वीजनिर्मिती करण्यासाठी पुरेसा कोळसा नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच राज्यातील वीज प्रकल्पाना कोळसा पुरवण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मग एकलहरे वीज निर्मिती प्रकल्पात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा असताना दानवेंच्या हे विधान फोल ठरले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ते नाशिक येथे खाजगी कामानिमित्त काही वेळ थांबले असता त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, राज्य वीज वितरण कंपनीने ज्यावेळी नियोजन करायला हवे होते, त्यावेळी केले नाही. त्यामुळे राज्यात विजेचे संकट जाणवत आहे. केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. राज्यातील नागरिकांना वीज पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून केंद्राची जबाबदारी फक्त कोळसा पुरवण्याची आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त कोळशा साठा उपलब्ध असताना नाशिकमधील एकलहरे मोठ्या वीज प्रकल्पात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच साठा आहे. उन्हाळा सुरू झाल्याने घरगुती व कृषी क्षेत्रासाठी लागणारी वीज तसेच उद्योग-व्यवसायाची चक्र गतिमान झाल्याने राज्यात विजेची मागणी वाढली आहे, मात्र वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत असून नाशिकच्या केंद्र तो तीन दिवसांचा साठा शिल्लक आहे. मंगळवार दिनांक ०१ मार्च रोजी संध्याकाळी विजेची मागणी २१ हजार ४८३ मेगावॅट पर्यंत पोहोचली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून पिक अवर्सला विजेची मागणी २५ हजार प्लस मेगावॅट राहिली आहे. परिणामी विजेचे उत्पादन अधिकाधिक घेण्यासाठी महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापन आटोकाट प्रयत्न करीत आहे.

असे असताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी एकीकडे केंद्र शासनाकडे मागीलवर्षी पेक्षा जास्त कोळशा साठा असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे एकलहरे येथे तीन दिवस पुरे इतका साठा असल्याचे निदर्शनास आले. जर केंद्र शासनाची कोळशा पुरवण्याची जबाबदारी असताना एकलहरे केंद्राला कोळशाचा तुटवडा का जाणवत आहे. एकीकडे मंत्री दानवे यांनी नाशिकमध्ये असताना याबाबत वक्तव्य केले तर दुसरीकडे नाशिकलाच वीज पुरवणाऱ्या एकलहरे केंद्रात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने वीजनिर्मितीच्या कंपनी व्यवस्थापनाला कोळशा पुरवावा लागत आहे.