नवी दिल्ली । प्रतिनिधी
प्रत्येकाला आपल्या देशावर प्रेम आहे. देशाच्या रक्षणासाठी लोक आपल्या प्राणांची आहुती देतात. देशभक्तीशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सध्या रशिया -युक्रेन वाद सुरु असून यामुळे युक्रेनमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत या आहे. तर अनेकांना आपला बळी गमवावा लागला आहे. यामुळे अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. तर अनेकजण थांबून युद्ध समाप्तीची वाट पाहत आहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक चिमुरडी आपल्या देशासाठी सैनिकासोबत एकटीने लढण्यास तयार असून त्याच्याशी भांडते आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेकजण हा व्हिडीओ पाहताना भावनिक झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या चिमुरडीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक त्या धाडसी मुलीला सलाम करत आहेत.